By  
on  

सरोज खान यांच्यासोबत काम करुन रितेशच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली

अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सरोज खान यांच्या निधनावर शोक  व्यक्त करीत आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.अल्लादिन या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत काम करण्याची रितेशची इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्णत्त्वास आली.

"सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवूड इंस्ट्रीला खूप मोठी हानी झाली आहे. त्यांनी आजवर २००० पेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली आहेत. मी अलादीन या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी या चित्रपटातील गाणे कोरिओग्राफ केले होते. त्यांनी मला कोरिओग्राफ केल्याने माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली आहे"  अशा  आशयाचे ट्विट रितेशने केले आहे.

 

 सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive