अगणित पुस्तकांची मुखपृष्ठ, मांडणी करणारे आणि नाटकांच्या असंख्य जाहिराती करणारे ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचं त्यांच्या मुलुंड येथील घरी.दुःखद निधन झालंं आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमल शेडगे यांचा जन्मा 22 जून 1935 मध्ये गिरगावात झाला होता. त्यांचे वडील देखील इंग्रजी दैनिकात शिर्षक बनवण्याचं काम करायचे. आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सुलेखन क्षेत्रात आले. गेली अनेक वर्षे मराठी नाटकांची, आणि विविध जाहीरातींची शिर्षके त्यांनी त्यांच्या वळणदार लेखणीतून साकारली आहेत.
'रायगडाला जेव्हा जाग येते', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'गारंबीचा बापू', 'ती फुलराणी', 'स्वामी', 'ऑल द बेस्ट', 'वस्त्रहरण' अशा विविध नाटकांच्या जाहिरातीसाठी त्यांनी सुलेखन केलं होतं. शिवाय त्यांनी लिहीलेली माझी 'अक्षरगाथा', 'चित्राक्षर' आणि 'कमलाक्षरं' ही सुलेखनवरील पुस्तके प्रसिध्द आहेत.
कमल काका (कमल शेडगे) यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. माझ्या बऱ्याच नाटकांचे fonts त्यांनी design केले होते. श्री स्वामी समर्थ...
— Kedar Shinde (@mekedarshinde) July 4, 2020
सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध कलावंतांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.