अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण किती फिटनेस फ्रिक आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हीच बाब त्याच्या ८१ वर्षीय आईचीसुध्दा. उषा सोमण यांचा या वयातला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. कधी सुनेसोबत फुगडी, लंगडी तर मुलासोबत दोरी उड्या खेळतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. नेटकरीसुध्दा त्यांना भघोस प्रतिसाद देतात. एक नवा आदर्शच त्या सर्वांसमोर आणि खास करुन तरुण पिढीसमोर ठेवतात. मिलिंद यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत उषा सोमण चक्क १५ पुशअप्स काढताना पाहायला मिळतायत. खरंच आश्चर्याने तोंडात बोटं घालायची वेळ आहे.
मिलिंद सांगतो, " ३ जुलै २०२०. लॉकडाउनमध्ये वाढदिवस साजरा केला. १५ पुशअप्स आणि अंकिताने बनवलेल्या केकसोबत पार्टी केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओत उषा सोमण पुशअप्स करताना दिसत आहेत."
उषा सोमण यांचा हा उत्साह नक्कीच आपल्यासाठी व नव्या पिढीसाटी एक आदर्शच आहे.