आजच्या धावपळीच्या युगात फिटनेसलासुध्दा तितकंच महत्त्व आहे. फिटनेस राखण्यासाठी आवर्जुन वेळ काढणं ही काळाची गरज आहे. सेलिब्रिटींचंच पाहा ना....कधी व्यायाम तर कधी योगा...नेहमीच यात सातत्य आणून स्वत:ला फिट ठेवतात. अभिनेत्री माधवी निमकर किती फिटनेस फ्रिक आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही . पण या लॉकडाऊनमध्ये माधवी अनेक अवघड आसनं करून फॅन्सनाही चकित करण्याचा जणू छंदच जोपासते आहे.
पुन्हा एकदा एक कठीण आसन करुन माधवीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. समतोल आणि एकाग्रता साधून हे आसन तुम्हालासुध्दा जमू शकतं असं माधवी म्हणते. हो पण त्यासाठी नियमित सराव पण हवाच हा...
अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगा करते आणि स्वत:ला फिट राखते, अनेक नेटकरी हे माधवीच्या योगाआसनांचे जबरदस्त फॅन आहेत.
'माधवी निमकर आपल्याला माहीत आहे ती ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेमुळेत. याशिवाय माधवीने या गोजिरवाण्या घरात, उन पाऊस, जावई विकत घेणे आहे, अनामिका अशा अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. याशिवाय संघर्ष, धावाधाव, सगळं करून भागले या सिनेमांमध्येही तिने भूमिका साकारल्या.