मालिका, सिनेमांच्या झगमगत्या चंदेरी दुनियेच्या आड अनेक गोष्टी दडल्या असतात ज्या प्रेक्षक व इतर सामान्यांना कधीच कळत नाहीत. पण आज सोशल मिडीयामुळे त्यांच्यावर होणा-या अन्यायाला किंवा होणारी जी हेळसांड आहे त्यांना वाचा फुटू लागली आहे. तीन महिन्यांच्यावर सर्व मालिका- सिनेमांचं चित्रिकरण करोना संकटामुळे ठप्प झालं होतं. पण आता हळूहळू या सर्वांना सुरुवात होत आहे. पुनश्च हरिओम म्हणत कलाकार, तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम योग्य ती खबरदारी घेत जोमाने कामाला लागली आहे.
चित्रिकरण म्हटलं की , १०-१२ तासांची सलग शिफ्ट ही ओघाने आलीच. त्यात कधीच कुठली कपात केली जात नाही. आता जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात तर झाली, मात्र त्या कामाचे पैसे कलाकारांना ९० दिवसांनंतर मिळणार. त्यामुळे खर्चाची व आयुष्याची सांगड कशी घालायची असा संतप्त सवाल अभिनेत्री हेमांगी कवीने नुकताच फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.
हेमांगी म्हणते, " बऱ्याच serials च्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये...छान मस्त! पण ते 90 days credit चं भूत अजून ही मानगुटीवर आहे... आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर! 365 पैकी 200 दिवस पैसे account ला जमा होणार नाहीत...कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये!
Insurance policy चे premiums कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय?"
" उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत phone करायचे, messages करायचे... आज ...उद्या... या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही!
कलाकार आणि techincal team कडून full support ची अपेक्षा! पण payment च्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही!
आता तर 'new normal' सुरू झालंय! कलाकाराने स्वतः make up, hair, costumes करायचे, स्वतःच spot दादा व्हायचं! आणि मुख्य म्हणजे वेळेत ७ च्या shift ला, महिला कलाकारांना तर ४.३० वाजता उठून ६.३० च्या call time ला हजर रहायचं... पण मिळणाऱ्या payment चं timing? ते आधी ही गंडलेलं होतं आता ही तसच गंडणार आहे! हे कोण monitor करणार?
Contract मध्ये तसं लिहूनच येतंय... म्हणजे ज्याला काम करायचंय तो करेल... ज्याला हे contract पटत नसेल त्याने अजून 100 काय 365 दिवस घरात बसून काढेल! "
काहीच कसं वाटत नाही यार हे contract ready करताना! निदान काही महिने तरी 30 दिवसाचं credit ठेवाव, असं हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोतसुध्दा तिने टाकला आहे.