By  
on  

'का रे दुरावा' फेम ही अभिनेत्री अडकली दाक्षिणात्य पध्दतीने लग्नबंधनात, पाहा Photos

'का रे दुरावा' या मालिकेतील ही सौंदर्यवती अभिनेत्री नुकतीच बोहल्यावर चढली आहे. या मालिकेत जुई साकारुन घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकरने नुकताच दाक्षिणात्य पध्दतीने लग्नगाठ बांधली. काही महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा संपन्न झाल्याचं तिनेच सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.

 

 अर्चना निपाणकरने पार्थ रामनाथपुर याच्यासोबत विवाह केला, त्यांच्या लग्नाचा फोटो नुकताच अर्चनाने पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback

A post shared by Archana (@archananipankar) on

अर्चना व पार्थ यांच्यावर संपूर्ण कलाविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पार्थ आणि अर्चना हे दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहेत.  दाक्षिणात्य लुकमध्ये नववधू अर्चना खुपच अप्रतिम  दिसतेय. 

 

अर्चना आशुतोष गोवारीकरांच्या भव्य-दिव्य 'पानिपत' या सिनेमात झळकली होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने मराठीच्या छोट्या पडद्यावरुन थेट बॉलिवूडपर्यंत धडक मारली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive