By  
on  

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ह्या लक्षवेधी फोटोवर होतोय कोतुकाचा वर्षाव !

जिच्या नावाने काळजाचा ठोका चुकतो ती बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.  'धकधक गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालते.सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या या अभिनेत्रीचं नृत्यावरचं प्रेम तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजही ती कथ्थकचा रियाज न चुकता करते. तिच्या इन्स्टाग्राम व्हिडींओवरुन ते लक्षात येतं. डान्स शोचं परिक्षण असो किंवा सध्या ऑनलाईन डान्स क्लास घेणं असो माधुरीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. 

सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहयला माधुरीला नेहमीच आवडतं. माधुरीने नुकताच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून या फोटोची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा माधुरीने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरतंय. 

 

माधुरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन म्हणून एक शायरी दिली आहे. “लाकर थोड़ी सी खुशी अपने चेहरे पर, हमने खुद को दूसरों से अलग बना लिया, लोग ढूंढ़ते रहे मुस्कुराने का कारण, हमने दूसरों की खुशी को अपना बना लिया,” असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे. 

 

 

माधुरीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive