By  
on  

आणि श्रध्दा कपूरने जिंकली चाहत्यांची मनं, मराठीत लिहला हा खास मेसेज

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून श्रध्दा कपूर ओळखली जाते. श्रध्दाची आई शिवानी कपूर या मूळच्या महाराष्ट्रीयन. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या श्रध्दाची मावशी. त्यामुळे लहानपणापासून मराठी मातीचे संस्कार श्रध्दामध्ये रुजले आहेत. अनेकदा श्रध्दाचं मराठी प्रेम दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा चाहत्यांसाठी मराठीत स्वत:च्या हातांनी मेसेज लिहून तिने मनं जिंकली आहेत. लय भारीच. 

श्रध्दाचे इन्स्टाग्रामवर आता तब्बल ५० मिलियन चाहतावर्ग झाला आहे. हा आनंद साजरा करताना श्रध्दा मराठीत  लिहते, " माझ्या सर्व बाबुडी, फॅन क्लब आणि हितचिंतकांनो,मी तुमच्या प्रेमाद्वारे पाहिलेल्या पोस्ट आणि व्हिडीओ पाहिल्या आणि माझे मन भरुन आले. मी तुमच्या सर्वांमुळे आज येथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम. असेच सुखी आमि आनंदी राहा.कृपया  स्वत:ची काळजी घ्या आणिएकमेकांशी प्रेमाने रहा. धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद....५० मिलियन वेळा धन्यवाद "

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on

 

श्रध्दाची ही मराठी पोस्ट पाहून चाहते भारावले आहेत आणि त्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.. जिंकलंच पोरीनं, 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive