By  
on  

सुबोध भावे म्हणतो, तुमचं अँपल तर आमचं सफरचंद ....

सध्या लॉकडाऊनच्या काळात सामान्यांसारखेच सेलिब्रिटीसुध्दा आपल्या कुटुंबांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत.रोज शूटींगच्या धावपळीमुळे आमि बिझी शेड्यूलमध्ये असा निवांत वेळ कधीच मिळाला नव्हता. त्यात मुलांसोबत तर फारच कमी वेळ प्रत्येकाला मिळतो. कारण आपल्या कामाचा व्याप आणि त्यात मुलांच्या शाळा-क्लासेसचे वेळापत्रक असं गणित जुळवून वेळ काढणं म्हणजे तारेवरची कसरत. पण लॉकडाऊनच्या दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मात्र मुलं आणि मोठे सर्वच घरी आहेत व सर्वांनी एकत्र मिळून दंगा घातला आहे. 

आता हेच बघा ना...सिनेविश्वातला लाडका अभिनेता सुबोध भावेसुध्दा त्याच्या मुलांसोबत मस्त क्वालिटी टाईम घालवतोय. नुकताच सुबोधने मुलाचा एक धम्माल फोटो शेअर केला आहे ज्यात त्याने  नवीन घड्याळ घातलं आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष...तर सुबोधने दिलेलं कॅप्शन आणि हा फोटो पण पाहा...तुमचं अँपल तर आमचं "सफरचंद घड्याळ"
"आत्मनिर्भर मल्हार"

अॅंपलच्या घड्याळासारखी हुबेहूब कार्डबोर्डची प्रतिकृती मल्हारने तयार केली आहे. 

 

या व्हिडीओवर चाहत्यांनी कॉमेंटस् आणि वर्षाव करत पसंतीची पावती दिली आहे. तर सेलिब्रिटींनाही हा व्हिडीओ खुप पसंत पडल्याचं कॉमेंट्समध्ये पाहायला मिळतंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive