कोणताही उत्सव किंवा सण असेल की मालिकांच्या सेटवरही उत्साहपूर्ण वातावरण असतं, कारण मालिकांमध्ये त्यानिमित्ताने काही स्पेशल भागांचं चित्रीकरण होत असतं. मग सेटवर कलाकार नटून थटून असतात. सध्याच्या गणेशोत्सवाचा उत्साह मालिकांच्या सेटवरही पाहायला मिळतोय.
'वैजू नंबर 1' मालिकेच्या सेटवरही गणेशोत्सव स्पेशल भागाचं चित्रीकरण सुरु आहे. याच निमित्ताने मालिकेतील महिला मंडळ नऊवारी साडी नेसून चित्रीकरण करत आहेत. नटून थटून सेटवर वावरणाऱ्या या कलाकारांनी नुकताच एक धमाकेदार व्हिडीओ बनवला आहे. सेटवर निवांत वेळेत हे कलाकार काहीना काही मजा करत असतात. असाच हा एक व्हिडीओ आहे.
अभिनेत्री निलम पांचाळने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत या मालिकेतील अभिनेत्री चक्क मराठमोळ्या अंदाजात फॅशन शो करताना दिसत आहेत. एकीकडे नऊवारी साडीतील स्वॅग आणि त्यावर फॅशन का जलवा गाण्यावर यांचा हा मराठमोळा फॅशन शो पाहणं मजेशीर वाटतय.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. निलम या पोस्टमध्ये लिहीते की, "'तीसरी मंजिल' मध्ये चाळीतील गणेशोत्सवा दरम्यान मराठमोळा फॅशन का जलवा...आणि बघत रहा वैजू नंबर १"
मालिकेता दाखवण्यात येणारी तीसरी मंजिल चाळ आणि त्या चाळीत राहणाऱ्या या महिला मंडळाचा मराठमोळ फॅशन का जलवा चांगलाच धमाकेदार आहे.