By  
on  

पाहा Video : अभिनेता स्वप्निल जोशीने या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ केला पोस्ट, आहे महाराष्ट्राची आवडती ऑनस्क्रिन जोडी

अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही महाराष्ट्रीच लाडकी ऑनस्क्रिन जोडी आहे. सिनेमा असो, मालिका असो किंवा जाहिरात, प्रेक्षकांना या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहायला प्रचंड आवडतं. बॉलिवुडमध्ये जशी शाहरुख - काजोलची जोडी प्रसिद्ध आहे तशी मराठीत स्वप्निल आणि मुक्ताची जोडी.

 

नुकतच स्वप्निल जोशीने मुक्ता बर्वेसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत स्वप्निल हा फोनमध्ये मुक्ताचे फोटो क्लिक करताना दिसतोय. हा व्हिडीओ या दोघांच्या चाहत्यांंना प्रचंड आवडला आहे. 'मगलाष्टक वन्स मोअर' या त्यांच्या सिनेमातील सर सुखाची श्रावणी या गाण्यावर हा व्हिडीओ केल्याने तो अतिशय सुंदर दिसतोय. 

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी ही 'मुंबई-पुणे-मुंबई' या सिनेमात जास्त पसंत केली गेली. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा आणि तिसरा भागही आला. यातही दोघांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. 'मंगलाष्टक वन्स मोअर' या सिनेमातीलही त्यांची केमिस्ट्री पसंत केली गेली. शिवाय टेलिव्हिजन म्हणजेच छोट्य पडद्यावरही दोघांना पसंती मिळाली आहे. त्यांनी केलेल्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive