By  
on  

बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करत सुमीत राघवन म्हणतो....

बॉलिवू अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मिडीयावर एकच संतापाची लाट उसळली. अनेक मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनीसुध्दा कंगनाच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करत ट्विट केले. म्हणूनच ट्विटरवरुन धमकावणा-यांना कंगनाने पुन्हा धमकी देत ट्विट केलं, "मी येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. काय करायचंय ते करा," असं तिनं म्हटलं. 

 त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे असे म्हटले. त्यांच्या या ट्विटवर अभिनेता सुमीत राघवनने पोस्ट करत सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे हे ट्विटरयुध्द चांगलंच रंगल्याचं दिसतंय. 

सुमीत राघवन आपल्या ट्विटमध्ये सवाल उपस्थित करताना म्हणतो, "सर, माझे बाबा मराठी माणूस नाहीत, मीही नाही. माझा जन्म इथेच झाला. मी इतरांपेक्षा चांगले मराठी बोलू शकतो. गेल्या ३० वर्षांपासून मी मराठी रंगभूमीवर काम करत आहे. माझी मुले मराठी शाळेत शिकली. मी म्हणतो मुंबई कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुष्मन झालो का? अतिशय चुकीचे विधान आहे तुमचे’'

 

सुमीतच्या या ट्विटने सर्वच नेटक-यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive