लता मंगेशकर एस. पी. बालसुब्रमण्यम यांची आठवण काढताना म्हणतात, ‘ ते एक उत्तम व्यक्ती होते’

By  
on  

प्रसिद्ध गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. करोनावर मात केल्यानंतरही त्यांचं निधन झाल्याने चाहते शोकसागरात बुडाले आहेत.  सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनीही बालसुब्रमण्यम यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

 

 

लता दीदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘प्रतिभाशाली गायक,  मधुरभाषी आणि एक उत्तम व्यक्ती एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार व्यथित झाले आहे. आम्ही दोघांनी अनेक गाणी एकत्र गायली, गाण्याचे अनेक शो केले. आजही ते सगळं आठवतं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.’  त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिट्लमध्ये  रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Recommended

Loading...
Share