अक्षय कुमार आणि ट्वींकल खन्नाने मुलगी निताराच्या वाढदिवसानिमित्त दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

By  
on  

सुपरस्टार अ‍क्षय कुमार आणि ट्वींकल खन्ना लेक निताराचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. अक्षयने नितारासोबत एक क्युट फोटो शेअर केला आहे. यामध्ये लेकीला कुशीत घेतलेला अक्षय दिसतो. तर ट्वींकलने तिच्या पुस्तकासोबत निताराचा फोटो शेअर केला आहे. 

 

 

अक्षय आपल्या पोस्टमध्ये लिहितो, ‘ मी जेव्हा 2020मध्ये मागे वळून पाहातो. हा माझ्या आयुष्यातील उत्तम काळ आहे आणि तो कायम रहावा असं मला वाटतं. हॅपी 8वा बर्थडे माझी प्रिंसेस. मी तुला सांगू शकत नाही इतकं प्रेम करतो.  ट्वींकल आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘ माझी मुलगी आज 8 वर्षांची झाली. वेगळ्या बीट्स आणि बॉब्ससोबत. माझ्या चिल्ड्रन बूकची कॉपी 'व्हेन आय ग्रो अप आय वांट टू बी’ ची कॉपी मी तिला प्रेझेंट केली आहे. ती मोठी होईल तेव्हा काय बनेल माहिती नाही. पण केवळ इतकं माहिती आहे की हे खुप वेगाने होत आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share