एस. पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं मराठी गाणं ऐकलं का? पाहा हा व्हिडियो

By  
on  

मलमली आवाजाचे गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. संगीत क्षेत्रातले ते दिग्गज होते. त्यांच्या निधनाने अवघ्या कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 

 

 

एस. पी यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडियो अभिनेता सुमीत राघवनने शेअर केला आहे. ‘अप्रतिम… केवळ अप्रितम’ असे म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एस. पींनी बॉलिवूडमध्ये खासकरून सलमानला आवाज दिला आहे.  आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

Recommended

Loading...
Share