By  
on  

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सोनू सुदचा युएनकडून गौरव

लॉकडाऊनमध्येअभिनेता सोनू सुदने अनेक मजुरांना त्यांच्या गावी स्पेशल बस करून पाठवलं होतं. त्यामुळे सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला . या कामासाठी सर्वत्रच त्याचं कौतुक झालं. देशभर त्याच्या कार्याचीच चर्चा सुरु होती.  याशिवाय सोनूने अनेक गरीब कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे.

 

सोनूच्या याच कामाचं UN च्या प्रतिष्ठित SDG Special Humanitarian Action Awardने कौतुक केलं आहे. हा पुरस्कार जगातील अगदी मोजक्याच व्यक्तींना दिला गेला आहे. सोनूचं नावही त्या व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाला आहे.  हा अ‍ॅवॉर्ड सोनूला एका व्हर्च्युअल इव्हेंटसाठी दिला गेला आहे. यावेळी आपला आनंद जाहीर करत सोनू म्हणतो, ‘ मी माझ्या देशवासियांसाठी जे काही करू शकतो तो खुप छोटा हिस्सा आहे.’ सोनूच्या आधी हा अ‍ॅवॉर्ड अ‍ॅंजेलिना जोली, डेविड बेकहॅम, लियोनार्डो डिकॅप्रियो, एमा वॉटसन या कलाकारांना दिला गेला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive