बिहारहून मुंबईत आलेला अभिनेता ‘अक्षत उत्कर्ष’ यांचा संशयास्पद मृत्यू

By  
on  

बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवण्यासाठी धडपडत असलेला अभिनेता अक्षत उत्कर्ष याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. अक्षत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. एका न्युज एजन्सीने दिलेल्या रिपोर्टनुसार त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

सध्या अपमृत्यूची नोंद झाली असून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं. अक्षत काम मिळत नसल्याने नैराश्यात होता. तर त्याच्या घरच्यांच्या मते, अक्षतने आत्महत्या केली नसून त्याचा खुन झाला आहे. आज त्याच्यावर मुजफ्फपुर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Recommended

Loading...
Share