By  
on  

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या ‘बाबा का ढाबा’साठी सेलिब्रिटीही सरसावले

दिल्लीमधील मालवीय नगर येथील ढाबा चालवणा-या आजोबांचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये त्यांनी बनवलेलं अन्न विकलं जात नसून त्यासाठी ते भावनिक झालेले दिसून येत होते. हा व्हिडियो इतका व्हायरल झाला आहे की, या आजोबांसाठी अनेक मदतीचे हात येत आहेत.

 

 

बॉलिवूडकरही या आजोबांसाठी मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. रवीना टंडनने या ढाब्यावर जेवण करून सेल्फी पाठवण्याचं आवाहन केलं. तर सोनम कपूरने या आजोबांचे डिटेल्स मागितले आहेत. स्वरा भास्करनेही या बाबांच्या ढाब्यावर जेवण करण्याचं आवाहन केलं आहे. तर सुनील शेट्टीनेही ट्वीट करत या आजोबांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive