By  
on  

DDLJ मधील या दृश्याची आयडिया होती शाहरुख खानची

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाने एका पिढीला जवळपास वेड लावलं. मुंबईतील मराठा मंदीरमध्ये हा सिनेमा आजही दाखवला जातो. एका इंटरव्ह्युमध्ये शाहरुखने खुलासा केला आहे की या सिनेमातील बरेचसे सीन हे आयत्यावेळी शुट केले गेले होते. 

 

या सिनेमात एक सीन आहे ज्यावेळी शाहरुख आणि अमरीश पुरी कबुतरांना दाणे टाकत असतात. यावेळी ‘आओ आओ’ हे शब्द वापरत कबुतरांना  बोलावत असतात. शाहरुख सांगतो, ‘कबुतरांना बोलवण्याचा हा प्रकार मी दिल्लीत पाहिला होता. मी हा सिनेमात जोडला.  याशिवाय अनुपम खेर म्हणतात, ‘ एका सीनमध्ये आम्ही दोघं खुप बडबड करताना दिसतो. त्यातील अनेक शब्द आम्ही सेटवरच तयार केले आहेत.’ यावेळी शाहरुखने आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनाचंही कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive