By  
on  

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर देणार ह्या वर्षातला सर्वात धमाकेदार एन्टरटेन्मेन्टचा डोस

सध्या  करोना महामारीसह अवघा देश शर्थीने झुंज देतोय. हळूहळू आपण पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत असलो तरी अद्याप परिस्थिती मात्र जास्त सुधारलेली नाही. अशातच अक्षय कुमारचा आगामी  'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत्या 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय. तत्पूर्वी आज दुपारी 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता याचा ट्रेलर येतोय, हा सिनेमा प्रेक्षकांना आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीचा विसर काही काळ पडायला लावणार एवढं मात्र नक्की. 

या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने यांनी केले असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील . ह्या सिनेमाचा ट्रेलर 3.15 मिनीटांचा आहे.  बहुधा बॉलिवूडमधील इतर सिनेमांपेक्षा खुप मोठा ट्रेलर आहे. ह्या हॉरर कॉमेडीपटात अक्षय व कियारा यांच्यासह तुषार कपूर, शरद केळकर आणि अश्विनी कळसेकर आदी कलाकारांच्या अफलातून अभिनयाचा धमाका पाहायला मिळतोय. 

या सिनेमात 'बुर्ज खलीफा' नावाचं एक गाणंसुध्दा आहे. हॉरर कथानकासह या सिनेमात रोमान्स आणि कॉमेडीचा तडकासुध्दा लागणार आहे. 

 

 

 

अक्षय कुमारने यापूर्वी ट्विट करत हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive