By  
on  

लग्नाचा 54 वा वाढदिवस नाही साजरा करणार सायराबानो, सांगितलं हे कारण

तब्ब्येत बरी नसल्याने दिलीप कुमार गेले काही दिवस आयसोलेशनमध्ये आहेत. पत्नी सायराबानोने दिलीप यांच्या ट्वीटर अकाउंटवरून एक मेसेज केला आहे. या ट्वीटमध्ये लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सायराबानो यांनी सांगितलं आहे. 

 

 

याशिवाय दिलीप यांच्या दोन्ही भावांचं निधन झाल्यानेही हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांना सावधगिरी बाळगण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यातच त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive