By  
on  

कन्नड सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक विजय रेड्डी याचं निधन

यंदाचं 2020 साल हे सिनेसृष्टीसाठी चांगलं नाही हे वेळोवेळी सिध्द झालं आहे. अनेक बडे कलाकार आपल्याला गमावावे लागले आहेत. आता पुन्हा एक दु:खद बातमी येऊन धडकली आहे. कन्नड सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक विजय रेड्डी याचं निधन झालं आहे.  शुक्रवारी वयाच्या 84 व्या वर्षी चेन्नईमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. 

विजय रेड्डी हे कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव . त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीय आणि चाहते शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी विजय रेड्डी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive