By  
on  

जहीर खान आणि सागरिकाच्या घरी येणार छोटा पाहुणा?

करीना कपूर, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींच्या ‘Mom to be’ यादीत आणखी एक अभिनेत्रीचं नाव समावेश होण्याची शक्यता दिसून येत आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि जहीर खास यांच्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याचं समजत आहे. 
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार सागरिका गर्भवती असल्याचं समोर येत आहे.

सागरिका सध्या दुबईमध्ये आहे. नुकताच जहीरने त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान तिने घातलेल्या ड्रेसमधून बेबी बंप दिसून येत होतं. अर्थात जहीर आणि सागरिकाकडून याबाबती कोणतंही विधान केलं नाहीये. सागरिका आणि जहीरने 24 एप्रिल 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive