By  
on  

‘तारक मेहता...’ मालिकेतील या कलाकाराबाबत पसरवल्या जात आहेत अफवा, दिलं हे स्पष्टीकरण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास आवडीची आहे. कौटुंबिक प्रकारात मोडणा-या या डेलीसोपचे चाहते अनेक आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा खास असा चाहता वर्ग आहे. 
पण या मालिकेत गोगीची व्यक्तिरेखा साकारणा-या समय शाहवर हल्ला झाल्याच्या बातम्या काही दिवसांपुर्वी व्हायरल झाल्या होत्या. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. 

 

 

पण आता समयने स्वत:च ट्वीट करत ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. अलीकडच्या काळात त्याच्यसोबत कोणताही असा प्रकार घडला नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. या बातमीसोबत व्हायरल झालेला व्हिडियोही लॉकडाऊनच्या पुर्वीच्या कालावधीचा असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्याने मुंबई पोलिसांचेही आभार मानले आहेत.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive