By  
on  

अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल, जाणून घ्या

 ‘कौन बनेगा करोडपती’ हा बिग बींचा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो.  या कार्यक्रमात विचारल्या जाणा-या विविध प्रश्नांची प्रेक्षकांना नेहमीच  उत्सुकता असते. निमित्ताने ज्ञानात भर पडत असल्यानेही अनेक जण पाहणं पसंत करतात. पण ह्या कार्यक्रमामुळे एक वाद उफाळून आला आहे. 

कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार केली आहे. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत यासंबंधी हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे. “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसंच अत्यंत सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली”.'

 

 

 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही”. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive