By  
on  

अ‍क्षय आणि कृति सॅनॉनच्या ‘बच्चन पांडे’चा जानेवारीमध्ये होणार श्रीगणेशा?

26 जुलैला अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. यासोबतच त्याने त्याचा बच्चन पांडे सिनेमातील लूकही शेअर केला होता. या सिनेमात त्याच्यासोबत कृति सॅनॉन झळकणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. 

आता या सिनेमाच्या शुटिंगचा पुढील वर्षी श्रीगणेशा होणार असल्याचं समजतं आहे. पुढील वर्षी जैसलमेरमध्ये मॅराथॉन शेड्युलमध्ये हे शूट संपवलं जाणार आहे. यातील बहुतांश शुट रिअल लोकेशनवर होईल. सगळ्या क्रु मेंबर्सची डिसेंबरमध्ये कोविड चाचणी केली जाणार आहे. लोकेशनची सफाईही पुर्वीच केली जाणार आहे. शुटिंग पुर्वी क्रु मेंबर्सना क्वारंटाईन केलं जाणार आहे.  अक्षय या सिनेमात एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसतो आहे. तर कृति यात पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive