By  
on  

मैत्रिण श्वेता अगरवालसोबत आदित्य नारायण अडकणार लग्नाच्या बेडीत

प्रसिद्ध गायक आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अगरवालसोबत लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपुर्वीच आदित्यने श्वेतासोबतच्या त्याच्या नात्याची कबुली दिली होती. ही जोडी याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

 

 

आदित्य आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘आम्ही लग्न करत आहोत. मी खुप नशीबवान आहे की मला श्वेता मिळाली. डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करत आहोत. दोघंही प्राईव्हेट पद्धतीचे लोक असल्याने हा कार्यक्रमही तसाच आहे. लग्नाच्या तयारीसाठी सोशल मिडियाचा निरोप घेत आहे.’  
आदित्य आणि श्वेताची भेट ‘शापित’च्या सेटवर झाली होती. दोघांनीही मैत्री आणि त्यानंतर प्रेम असा प्रवास केला आहे. काही दिवसांपुर्वीच या दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा होत होत्या. या दरम्यान त्याच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive