By  
on  

बॉबी देओलच्या ‘आश्रम चॅप्टर 2’ बाबत करणी सेनेने पाठवली नोटीस, जाणून घ्या

करणी सेनेने प्रकाश झा यांच्या ‘आश्रम चॅप्टर 2’ ला लीगल नोटीस पाठवली आहे. या सिरीजचा दुसरा चॅप्टर 11 नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर रिलीज होत आहे. 'आश्रम चॅप्टर 2- द डार्क साइड' असं या नव्या भागाचं नाव आहे. 
या ट्रेलर रिलीजनंतर  महाराष्ट्रतील करणी सेनेचे प्रदेश संगठन मंत्री सुरजीत सिंह यांनी मेकर्सना नोटीस पाठवली आहे.

 

'आश्रम चॅप्टर 2- द डार्क साइड'चा ट्रेलर हिंदूंच्या धार्मिक भावनांना आवाहन करत आहे. यासोबतच येणा-या पिढीसमोर हिंदू धर्माची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचंही या नोटीशीत म्हटलं आहे. याशिवाय ‘सिरीजमधील पहिल्या चॅप्टरमध्येही काही विवादास्पद बाबी दाखवल्या गेल्या होत्या. तेच आता दुस-या चॅप्टरमध्येही सुरु आहे. त्यामुळे या सिरीजचं प्रक्षेपण थांबवलं जावं.’ अशी मागणी केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive