By  
on  

‘शेरनी’च्या मेकर्सनी विजय राज यांच्याविरोधात नेमली चौकशी समिती?

2  नोव्हेंबरला बालाघाट (मध्यप्रदेश) विद्या बालन अभिनीत शेरनी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता विजय राज यांना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. रामनगर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना अटक झाली आहे. यानंतर त्यांना जामीनही मिळाला. आता मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार शेरनीचे निर्माता बुधवारी एका आंतरिक चौकशी समितीची नेमणूक करत आहेत. 

 

विजय मंगळवारी मुंबईला रवाना झाले आहेत. आता विजय सेटवर येऊ शकत नाहीत. विजय जामीन मिळाल्यानंतर मुंबईला रवाना झाले आहेत. ते रहात असलेल्या हॉटेलमध्येही दिसले नाहीत. प्रॉडक्शन क्रुने सांगितलं की विजय पुन्हा काम करणार नाहीत. त्यांचे सिनेमातील दोन सीन बाकी आहेत. आयसीसीच्या निर्णयानंतर एकंदरीत प्रकरणाचा निर्णय घेतला जाईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive