By  
on  

मराठा मंदिरमध्ये पुन्हा एकदा खुलणार सिमरन आणि राजमधील रोमान्स

एका पिढीवर भुरळ घालणारा सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. या सिनेमाने आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. मराठा मंदिरमध्ये 24 वर्षांहून अधिक काळ या सिनेमाने स्वत:चं खास स्थान निर्माण केलं आहे. मात्र लॉकडाउन आणि करोना काळात सिनेमागृहं बंद असल्याने हा सिनेमाही मराठा मंदिर चित्रपटगृहात दाखवला जात नव्हता. 

पण महाराष्ट्र शासनाने सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिल्याने हा सिनेमा पुन्हा एकदा मराठा मंदिर सिनेमागृहात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू झाले आहेत. पण हे सर्व केवळ 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. मात्र एरवी प्रमाणे प्रेक्षकांना थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ मात्र घेऊन जाता येणार नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive