By  
on  

Bollywood drug case: झडतीवेळी अर्जुन रामपालच्या घरी सापडली NDPS मध्ये समावेश असलेली औषध

नार्कोटिक्स ब्युरो गेले काही दिवस बॉलिवूड ड्रग्जची पाळंमुळं खोदून काढत आहे. त्यामुळेच सोमवारी NCBने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा मारला. NCBने अर्जुन रामपालला समन्स बजावले आहेत. याशिवाय अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डिमेट्रिएड्सला या प्रकरणी समन्स बजावले आहेत.  अर्जुन आणि गॅब्रिएलाला 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. 

अर्जुनच्या घरी NCB काही ड्रग्ज आणि साइकोट्रोपिक पदार्थ मिळाले आहेत. कायद्यानुसार त्यावर बंदी आहे. अर्जुनच्या घराची झडती 8 तासाहून अधिक काळ चालली होती. याशिवाय अर्जुनचे फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर गॅझेट्स जप्त केले आहेत. यापुर्वीअर्जुनची गर्लफ्रेंड  ग्रैब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोसलाही NCBने ताब्यात घेतलं आहे. याशिवाय फिरोज नाडियाड्वाला यांच्या पत्नी शबाना सईद यांनाही या प्रकरणी अटक केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive