By  
on  

अजय देवगणने मिळवला अमेझॉन प्राईमसोबत हात, पाच सिनेमांची डील

अजय देवगनचे तारे सध्या चांगलेच तेजीत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच अजयच्या तानाजीने चांगलाच गल्ला जमवला होता. त्यानंतर त्याने नवे सिनेमे साईन करण्याचा सपाटा सुरु आहे. आता अशी बातमी समोर येते आहे की अजय देवगण ने अमेजॉन प्राइम सोबत पाच बिग बजट प्रोजेक्ट्स ची डील साईन केली आहे. 

सलमानसोबतच्या डीलनंतर ही सर्वात मोठी डील असल्याचं बोललं जात आहे. अजय सध्या स्टार नेटवर्कसोबत काम करतो आहे. हॉटस्टारवरून तो त्याचा डिजीटल डेब्यु करणार आहे.  याशिवाय अजय बिग बींसोबत सात वर्षांनंतर ‘मे डे’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा अजय स्वत: डायरेक्ट करणार आहे. याशिवाय निर्माताही तोच आहे. हैद्राबादमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरु होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive