By  
on  

‘नागिन’लूकमध्ये दिसला श्रद्धा कपूरचा अनोखा अंदाज

अभिनेत्री श्रीदेवीच्या सिनेमांमधील माईलस्टोन सिनेमा म्हणजे नागिन. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. आता  श्रद्धा कपूर नागिन मधील  भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. निर्माते निखिल द्वीवेदी हे या सिनेमाची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. 

 

 

इच्छाधारी नागिनचे कारनामे हटके व्हिज्युअल इफेक्ट्स द्वारा प्रेक्षकांसमोर आणण्याची त्यांची इच्छा आहे. श्रद्धाने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांनी खास तयार केल्याचं म्हटलं जात आहे. चाहते तिच्या या नवीन लूक्सचं कौतुक करत आहेत. श्रद्धाच्या कास्टिंगबाबत निखिल त्रिवेदी म्हणतात, ‘श्रीदेवीजींनी या सिनेमात काम केलं आहे म्हणून जान्हवीचा या सिनेमासाठी विचार करणं तितकसं योग्य नाही. श्रद्धाच्या नावाचा विचार या भूमिकेसाठी फार पुर्वीपासून होता. जान्हवी उत्तम कलाकार असली तरी या भूमिकेसाठी श्रद्धाच पहिली चॉईस आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive