By  
on  

‘तेजाब’ ने पुर्ण केली 32 वर्षं, माधुरीने काढली सरोज खान यांची आठवण

माधुरी दीक्षितच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा सिनेमा म्हणजे ‘तेजाब’.  या सिनेमाने तिला यशाच्या शिखरावर नेलं. तिच्या आणि अनिल कपूरच्या सुपरहिट केमिस्ट्रीवर शिक्कामोर्तब केलं. या सिनेमाने नुकतीच 32 वर्षं पुर्ण केली आहेत. माधुरीने यानिमित्ताने एक व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये माधुरीचे अनेक फॅन्स तिच्या या कि स्टेप्स करताना दिसत आहेत. माधुरी आपल्या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये म्हणते, हा सिनेमा माझ्या मनाच्या खुपच जवळ आहे. हे गाणं मला जिवंत असल्याची सतत खात्री करून देत असतं. या गाण्यावर अजूनही प्रेम करण्यासाठी सर्वांचे आभार. सरोजजी तुमची आठवण येते. तुम्हाला हा व्हिडियो नक्कीच आवडला असता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive