By  
on  

अक्षयच्या ‘लक्ष्मी’ने सुशांत सिंग राजपुतच्या या सिनेमाला टाकलं मागे

थ्रिलर प्रकारात मोडणारी ‘देवमाणूस’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अजितची व्यक्तिरेखा अभिनेता किरण गायकवाडने अतिशय उत्तम साकारली आहे. पण या मालिकेत आणखी एका व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ही व्यक्तिरेखा आहे रेश्माची. रेश्मा आता या मालिकेत नसली तरी तिच्या अदाकारीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे.

 

 

रेश्माची व्यक्तिरेखा गायत्री बनसोडेने साकारली आहे. मुळची उस्मानाबादची असलेली गायत्री सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. गायत्री अभिनय करतेच पण पेशाने फॅशन डिझायनरही आहे. देवमाणूस ही तिची पहिलीच मालिका आहे. पण ती काळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गायत्री सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. तिचे हे स्टायलिश फोटो चाहत्यांना नक्कीच आवडतील यात शंका नाही.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive