By  
on  

सैफ आणि तैमूरसोबत धर्मशालामध्ये साजरी होणार करिनाची दिवाळी

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु आहे. ही दिवाळी उत्साहात साजरी करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न आहे. नुकतंच भूत पोलिसच्या शुटिंगसाठी सैफ टीमसहित धर्मशालाला रवाना झाला आहे. त्यामुळे करिनानेही यंदाची दिवाळी तैमूरसहित धर्मशालाला साजरी करण्याचं नक्की केलं आहे. 

ई टाईम्सशी बोलताना करिना म्हणते, ‘सैफ सध्या धर्मशालामध्ये शुटिंग करत आहे. आणि मी कधीच तिथे गेले नाहिये. त्यामुळे मी आणि तैमूर सैफला तिथे जॉईन करणार आहोत. डोंगर द-यांमध्ये प्रवास करताना मजा येईल. काही दिवस बाहेर राहिल्यावर बरं वाटेल. हि दिवाळी मोठी नसली तरी आनंददायी नक्कीच असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive