By  
on  

या दिवाळीमध्ये दीपिका आणि रणवीर कटाक्षाने पाळणार आहेत ही गोष्ट

दीपिका पदुकोणसाठी दिवाळी खुपच खास आहे. पण या दिवाळीसाठी तिचा आणि रणवीरचा प्लॅन मात्र काहीसा हटके आहे. रणवीर आणि दीपिका यावेळी एकदम साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करणार आहेत. 
‘सध्या अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळेच ही दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

 

आम्ही घरीच राहू , पुजा करू आणि कुटुंबासोबत वेळ घालवू.  यावर्षी दीपिकाची काय विश आहे विचारलं असता ती म्हणते, ‘ यावर्षी मी सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य आणि मन:शांती मागेन. दिवाळीशी माझ्या लहानपणीच्या खुप आठवणी जोडल्या आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवणं ही त्यातील सर्वात महत्वाची बाब आहे. आई-वडिल, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत असणं सुखकारक असतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive