By  
on  

दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं करोनामुळे निधन

दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. वृत्तानुसार सौमित्र हे प्रोस्टेट कॅन्सरने पिडित होते. काही वर्षांपुर्वीच त्यातून बरे झाले होते. याशिवाय क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिसऑर्डर याचाही त्रास होता. चटर्जी यांना दादा फाळके पुरस्कारने सन्मानित केलं गेलं होतं. याशिवाय ते पद्मभुषण पुरस्काराचेही मानकरी होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive