By  
on  

दीपिका-रणवीरच्या लूकची चाहत्यांनी केली मोतीचूर लाडू आणि गाजराचा हलव्याशी तुलना, दीपिकाने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूडच्या कलाकारांवर नेहमीच मीम्स बनत असतात. कधी त्यांचे कपडे, लूक्स तर कधी त्यांच्या सिनेमावरूनही मीम्स बनवले जातात. आता दीपिका आणि रणवीरच्या दिवाळी लूक्सवरूनही मीम्स बनले आहेत. 
या कपलचा लूक पाहून चाहत्यांनी मोतीचूर लाडू आणि गाजराचा हलव्याशी तुलना केली.

 

आता हा मीमला दीपिकाने मात्र भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाने इन्स्टा स्टोरीमध्ये हे मीम शेअर केलं आहे. दीपिका म्हणते, ‘नक्कीच. का नाही’ दीपिका प्री दिवाळी पार्टीसाठी सिद्धार्थ चतुर्वेदीच्या घरी पोहोचली होती. तिच्यासोबत यावेळी अनन्या पांडे देखील होती. या 14 नोव्हेंबरला या जोडीच्या लग्नाला 2 वर्षं पुर्ण झालं. यावेळीही दोघांनी हटके कॅप्शन देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या.

Recommended

PeepingMoon Exclusive