By  
on  

भारतीय निवडणूक आयोगाने सोनू सुदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली

देशात सोनू सुदचं नाव माहिती नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रत्येक गरवंताच्या ओठी सोनू सोनू सुदचं नाव आहे. त्याच्या कार्याची माहिती वेगळी सांगायची गरज नाही. 

 

आता सोनूची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. एका पत्रकात ही माहिती दिली आहे. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजूकडून सोनूला हा प्रस्ताव पाठवला गेला होता. हा प्रस्ताव येताच सोनूला आनंद वाटला. त्याचं मूळ गाव पंजाबमधील मोगा जिल्ह्यात आहे. 

आता सोनू पंजाबमध्ये निवडणूकांसंदर्भात जागरुकता करताना दिसेल. सोनू म्हणतो, मी या सन्मानासाठी स्वत:ला नशिबवान मानतो. मला आनंद आहे माझ्या राज्याला मला अभिमान वाटतो. या सन्मानामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive