By  
on  

तिस-यांदा बांद्रा पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पाठवले समन्स

3 नोव्हेंबरला पोलिसांनी कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. यावेळी 9 नोव्हेंबरला कंगनाची तर 10 नोव्हेंबरला रंगोलीची चौकशी होणार होती. यापुर्वीही 26-27 ऑक्टोबरला कंगनाला आणि रंगोलीला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण दोघी हजर राहिल्या नाहीत.

 

बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये 124ए (राजद्रोह), 295ए आणि 153ए या कलमांखाली एफआयआर दाखल केली गेली होती. आपल्या ट्वीट्समधून महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन करणं आणि सामाजिक सौहार्द बिघडवणं हे काम केल्याचं एफआयआर मध्ये म्हटलं आहे. याशिवाय ती प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड विरोधात बोलत असल्याचंही दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive