By  
on  

सुप्रीम कोर्टाने नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ च्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्यासाठी दिला नकार

आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यात कुकटपल्ली कोर्टने नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या झुंड सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्यासाठी दिला नकार दिला आहे. कोर्टाने या सिनेमावर कॉपीराईटच्या उल्लंघनाचा आरोप लावला आहे. आता सुप्रीम कोर्टानेही प्रदर्शनावरील बंदी उठवण्यासाठी दिला नकार दिला. त्यामुळे प्रदर्शनासाठी या सिनेमापुढच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. 

त्यामुळे सध्यातरी हा सिनेमा रिलीज व्हायच्या शक्यता धुसर आहे. चीफ जस्टिस एसए बोबडे, चीफ जस्टिस ए एस बोपन्ना आणि वी. रामासुब्रमणियन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने निर्मात्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. यासोबतच हा सिनेमा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करता येणार नसल्याचंही सांगितलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive