नुकतीच सुपरस्टार सलमान खान याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली होती. सलमानचा ड्रायव्हर व दोन जवळच्या स्टाफ मेंबर्सना करोनाची लागण झाली असल्याचं समजलं होतं. याशिवाय पुढील १४ दिवस सलमान आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचंही समोर येत होतं.
पण नुकत्याच आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सलमान आणि त्याच्या कुटुंबाची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय BMC ने सलमानचं अपार्टमेंट सॅनिटाईज केलं आहे. सलमान यापुर्वी आयसोलेट होता. पण आता तो 'बिग बॉस 14' च्या वीकेंडच्या वारचं शुटिंग करणार असल्याचं समोर येत आहे.