अभिनेत्री मालवी मल्होत्रावर काही महिन्यांपुर्वी निर्माता योगेश महिपाल सिंगने चाकूने हल्ला केला होता. त्यात मालवी गंभीर जखमी झाली होती. योगेशला मालवीसोबत लग्न करायचं होतं. त्याला नकार दिल्यावर मालवीवर त्याने हल्ला केला. आता तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
@CMOMaharashtra @MumbaiPolice @AnilDeshmukhNCP #sandeepkarnik @cnnbrk @indiatvnews @timesofindia @bombaytimes @MumbaiMirror @ABPNews @republic @ANI @mid_day @IndianExpress @mybmc @ZeeNews @NavbharatTimes @dna @ndtv @indiatvnews #nobailforyogeshkumar pic.twitter.com/h6htgzRXLS
— Malvi Malhotra (@MalviMalhotra) November 19, 2020
मालवीने ट्वीट करत पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. मालवी आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘ मला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या हल्ल्याने मला मानसिक आणि शारिरीक स्तरावर थकवलं आहे.
मी पोलिसांचं योगेशला अटक केल्याबद्दल कौतुक करते. मी विनंती करते की मला आणि माझ्या कुटुंबाला पोलिस संरक्षण दिलं जावं. ‘ मालवीने ‘उडान’ या मालिकेत काम केलं आहे.