आदित्य नारायण-श्वेता च्या विवाहपुर्व विधींचे फोटो, दिसला खास अंदाज

By  
on  

आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अगरवालसह उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या समारंभाच्या विवाहपुर्व विधींना सुरुवात झाली आहे. या विधींचे फोटो आणि व्हिडियो फॅन पेजवर दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये आदित्य आणि श्वेतासोबत उदित नारायण आणि दीपा नारायणही दिसून येत आहेत. 1 डिसेंबरला मंदिरात हे लग्न पार पडणार आहे.

 

 

आदित्यने, ‘त्याच्या लग्नाचं फंक्शन खुपच सिंपल होणार असल्याचं सांगितलं आहे. करोनामुळे  खुपच साधेपणाने लग्न करणार असल्याचं आदित्यने शेअर केलं आहे. मंदिरमधील लग्नानंतर एक छोट्सं रिसेप्शनही असणार आहे. या लग्नात आदित्य-श्वेताच्या जवळचे नातेवाईक याशिवाय संगीत क्षेत्रातील काही जवळची मंडळीच उपस्थित असतील. आदित्य आणि श्वेता शापित सिनेमाच्या वेळी एकमेकांना भेटले होते.

 

Recommended

Loading...
Share