By  
on  

अ‍ॅंटी-स्टरलाईट प्रोटेस्टवर कमेंट केल्याप्रकरणी ज्युडिशरी कमिशनरनी रजनीकांत यांना पाठवलं समन्स

तमिळनाडूमधील तुतीकोरिनमधील वेदांता स्टरलाईट फॅक्टरीमधील हिंसा प्रकरणात ज्युडिशरी कमिशनरनी रजनीकांत यांना समन्स पाठवलं आहे. 19 जानेवारी 2021मध्ये त्यांना व्यक्तिगतरित्या हजर राहण्यास सांगितलं आहे. 2018 मध्ये वेदांता स्टरलाइट कॉपर यूनिट बंद करण्यासाठी लोक प्रदर्शन करत होते.

 

यावेळी झालेल्या चकमकीत 13 प्रदर्शन कर्त्यांची हत्या झाली. यावेळी जखमींना भेटण्यासाठी रजनीकांत गेले होते. यावेळी या आंदोलनात असामाजिक तत्वांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला. यासाठी त्यांना या प्रकरणासाठी चौकशीला बोलावलं जाणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive