By  
on  

सारा अली खानचा हा अंदाज पाहून अक्षय कुमारने लावला डोक्याला हात, पाहा व्हिडियो

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष स्टारर  अतरंगी रे च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यावेळी अलीकडेच ताजमहालच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे. सारा अली खानने अलीकडेच एक व्हिडियो शेअर केला आहे. 
यामध्ये ती फॅन्सना ताजमहालचं सौंदर्य दाखवत आहे. यासोबतच अक्षयसाठी एक शायरीही शेअर करते.

 

 

पण तिची अतरंगी शायरी ऐकून अक्षय मात्र डोक्याला हात लावतो. सारा या व्हिडियो मध्ये म्हणते, ‘दर्शकों, हमारे पास हैं एक ऐतिहासिक अतिथि, पेश हैं शाहजहां, मैं आपसे रिक्वेस्ट करती हूं कि देखिए वहां, मिस्टर कुमार यहां, जो मैंने कहा, ‘ हे ऐकताच अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, ‘'जैसा कि आप लोगों ने देखा इन्होंने राइम करने की कोशिश की है. इससे घटिया राइम आज तक नहीं हुआ, लेकिन कोशिश करने वालों की हार नहीं होती करते रहो.' अक्षय आणि साराची केमिट्री पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने समोर येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive