By  
on  

नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी गुरु रंधावा, सुझान खान यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी अंधेरीमधील एका मोठ्या क्लबवर धाड मारली. यामध्ये नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी अनेक हाय प्रोफाईल सेलिब्रिटींना ताब्यात घेतलं आहे. 21 डिसेंबरच्या रात्री एका क्लबमध्ये नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी 34 सेलिब्रिटींना ताब्यात घेतलं आहे. 

 

यावेळी क्लबमध्ये गुरु रंधावा, रॅपर बादशहा आणि सुझान खान हजर होती. याशिवाय क्रिकेटर सुरेश रैनादेखील या पार्टीला हजर होता. त्याच्याविरोधातही केस झाली आहे. अटकेनंतर या सगळ्यांची जामीनावर सुटका झाली आहे. आयपीसी कलम 188, 269 नुसार यांना अटक केली आहे. ड्रॅगन फ्लाय पबमधून यांना अटक केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive