अनुष्का आणि विराटने नोट शेअर करत पापाराझींना केली ही अपील

By  
on  

सेलिब्रिटी कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच आई-बाबा बनले आहेत. 11 जानेवारीला या जोडीला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यावेळी विराटने त्याच्या प्रायव्हसीचा आदर ठेवण्याची विनंती केली होती. यानंतर त्याने लेकीच्या प्रायव्हसीसाठी पापाराझींना फोटो न घेण्याची विनंती केली आहे. अनुष्का आणि विराटने एक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘ हॅलो या सगळ्या वर्षी आमच्यावर इतकं प्रेम केल्याबाबत धन्यवाद. 

 

तुमच्यासोबत हा क्षण साजरा करण्याचा आनंद वेगळा आहे. पण एका मुलीचे आई-वडिल या नात्याने माझा पापाराझींना अनुरोध आहे की आमच्या लेकीच्या प्रायव्हसीचा आदर करा. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्हाला गरजेचा सगळा कंटेट मिळेल याची व्यवस्था करू. पण आमच्या बाळाची प्रायव्हसी जपली जावी.’

Recommended

Loading...
Share