By  
on  

ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा ‘शर्माजी नमकीन’ परेश रावल करणार पुर्ण

मागील वर्षी 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान ते ‘शर्माजी नमकीन’ सिनेमाचं शुटिंग करत होते. आता सिनेमाचा उर्वरित भाग परेश रावल पुर्ण करणार आहेत. तरण आदर्श यांनी ही बाब शेअर केली आहे. ऋषी यांच्या जयंती निमित्त हा सिनेमा रिलीज करण्याचं मेकर्सनी ठरवलं आहे. ऋषी यांच्या भूमिकेत आता परेश रावल दिसणार आहेत. 

या सिनेमाचा जास्तीत जास्त हिस्सा ऋषी यांनी शूट केला होता. केवळ चार दिवसांचं शुटिंग बाकी असताना ऋषी यांचं निधन झालं.  रितेश सिधवानी व फरहान अख्तर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमातून एका ६० वर्षीय व्यक्तीची हलकी- फुलकी गोष्ट आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive